सर्कस ग्राउंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जन आक्रोश मोर्चा
ताजा खबरों से अपडेट रहने के लिए हमारे Whatsapp Channel को Join करें |
बांग्लादेशातील हिंदू व अल्पसंख्यांवरील अत्याचाराच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा आयोजित।
सर्कस ग्राउंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी मोर्चात सहभागाचे आवाहन।
वर्धा/बांगलादेशातील निरपराध हिंदु तसेच इतर अल्पसंख्य धर्मीयानवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात, मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 2.00 वाजता सर्कस ग्राउंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निघणाऱ्या जन आक्रोश मोर्चात, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकुटुंब व आपल्या इष्ट मित्रासह सम्मिलित होऊन या अत्याचारच तीव्र निषेध नोंदवावा.
कट्टर धर्मांधतेच्या पार्श्वभूमीवर निष्पाप व शांततेने जीवन यापन करणाऱ्या हिंदू, बौद्ध, शिख व ख्रिश्चन बांधवांनवर अत्यंत निर्दयतेने हल्ले, जाळपोळ, महिलांवरील बलात्कार याद्वारे दहशत निर्माण करून, स्थानिक संस्कृतीचा विध्वंस करत, बळजबरीने तेथे आपले राज्य स्थापन करणे या हिंसक वृत्तीचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 2.00 वाजता सर्कस ग्राउंड येथे मोठ्या संख्येने एकत्र यावयाचे आहे.
जास्तीत जास्त संख्येने मोर्चात पायी चालत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जावयाचे आहे. ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांनी मोर्चाच्या शेवटी स्कूटर किंवा कारने सम्मिलित व्हावे.
विनीत :
गिरीश कांबळे
उपाध्यक्ष, वर्धा जिल्हा